जंतर मंतरवर कॉक्रोचे जनता पार्टीचे आंदोलन;धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
जंतर मंतरवर कॉक्रोचे जनता पार्टीचे आंदोलन;धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शनिवार 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, “मी भारतासाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या (Constitution) हाती सोपवतो, जय भीम!” असे त्यांनी म्हटले आहे. Cockroach Janata Party Abhijeet Dipke: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवणारअभिजीत दीपके शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करतील. विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात (Parliament Street Police Station) जाणार असून जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगीची (Permission) मागणी करणार आहेत. कारण, या आंदोलनासाठी अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसई (CBSE) परीक्षा निकालांमधील गडबडीच्या विरोधात हे आंदोलन केले जात असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी या पक्षाची आहे. Cockroach Janata Party Abhijeet Dipke: 4 दिवसांत 11 लाख सदस्य; भाजप-काँग्रेसला टाकले मागे अभिजीत दीपके यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाचे 11 लाखाहून अधिक नोंदणीकृत सदस्य (Registered Members) झाले असून वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनात हजारो समर्थक एकत्र येण्याची शक्यता आहे. Cockroach Janata Party Abhijeet Dipke: काय आहे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा इतिहास?
काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉक्रोच’ म्हणजेच झुरळांशी केली होती. याच विधानाचा आधार घेत सोशल मीडियावर उपरोधात्मक किंवा गमतीने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाचे हँडल तयार करण्यात आले होते. मात्र, अवघ्या चार दिवसांतच या हँडलचे फॉलोअर्स भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाल्याने या डिजिटल चळवळीने आता प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाचे रूप घेतले आहे.




