राजकीय
मुंबई विमानतळावरील सोने तस्करी प्रकरणावरून राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई विमानतळावरील सोने तस्करी प्रकरणावरून राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई : शनिवारी (6 जून) मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात डीआरआयने केलेल्या या कारवाईत 5 कोटींहून अधिक किमतीचे सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. भाजप पदाधिकारी अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीसह 5 जणांनाही अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अद्यापही फडणवीस का बोलले नाहीत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.



