ताज्या घडामोडी

जागतिक पर्यायावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण

जागतिक पर्यायावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

 

 

नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त परिसरात विविध रोपांची लागवड करीत त्यांच्या संवर्धनाचा संकल्प सोडण्यात आला.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे, जिल्हा न्यायाधीश एस. बी. भन्साळी, महानगरपालिका आयुक्त मनीष खत्री, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, वकील बांधव, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी न्यायालय परिसर हिरवागार करीत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.

मानवी जीवनात पर्यावरणाचे अनन्य साधारण महत्व आहे. प्रदूषण, जागतिक तापमान वाढ या सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये