गुन्हे
नाशिक तालुक्यातून २५ हजारांची ॲक्टिव्हा स्कूटी चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक तालुक्यातून २५ हजारांची ॲक्टिव्हा स्कूटी चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक :- घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा स्कूटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गोवर्धन शिवार परिसरात घडली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर दत्तू विंचू (वय ४२, रा. विंचू फार्म,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जवळ, गोवर्धन शिवार, नाशिक) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची सफेद रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिव्हा स्कूटी (क्रमांक MH 15 EM 6286) नेहमीप्रमाणे त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ४ जून २०२६ रोजी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय,लबाडीच्या इराद्याने ही स्कूटी चोरून नेली.
गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी आपल्या नातेवाईकांकडे आणि परिसरात सर्वत्र गाडीचा शोध घेतला.मात्र, गाडी मिळून न आल्याने त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून नाशिक तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार जे. सी. चव्हाण,करत आहेत.